Vd. Y. G. Joshi Uvaach (Marathi Version)


Vd.Y.G.Joshi

वैद्य. य. गो. जोशी यांचा जन्म निपाणी येथील उच्चशिक्षित हिंदु परिवारात झाला. वैद्य. य. गो. जोशी राष्ट्रीय स्तरावर ख्यातनाम आयुर्वेद चिकित्सक व पंचकर्म तज्ञ तसेच अतिशय उत्कृष्ट शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. वडील वैद्य. गो. रा. जोशी, ज्यांनी स्वत:चे आयुष्य आयुर्वेदाला अर्पण केले व जे अत्यंत प्रसिद्ध वैद्य होते, त्यांच्याकडून वैद्य. य. गो. जोशी यांना औषधी निर्माण आणि आयुर्वेद शास्त्र याबद्दल प्रेम व आस्था निर्माण झाली.

मुंबई येथून जी.एफ.ए.एम्. आणि जामनगर येथून एच्.पी.ए. पदवी प्राप्त केल्यानंतर वैद्य. य. गो. जोशी यांनी अचूक रोगनिदान, रुढ औषधींचे नवीन उपयोग, आयुर्वेदीय सिद्धांतांबद्दल नवीन दृष्टिकोन तसेच सूत्ररुप ग्रंथोक्त ज्ञानाचा रुग्ण चिकित्सेत समर्पक उपयोग याचे ज्ञान, त्यांचे गुरु वैद्यराज मामा गोखले यांच्याकडून संपादन केले. गुरुवर्य गोखले यांनी या इच्छुक तरुणाला त्यांचे आयुर्वेदाचे संपूर्ण ज्ञान दिले.

वैद्य. य. गो. जोशी यांनी विविध विषय जसे आयुर्वेदाच्या मुलभूत सिद्धांताशी निगडित शरीरक्रिया, रुग्णचिकित्सेशी संबंधित कायचिकित्सा इत्यादी अतिशय सोप्या व समजण्यास सुलभ अशा पद्धतीने शिकवण्याचे प्राविण्य मिळविले. वैद्य. य. गो. जोशी यांनी त्यांच्या पन्नास पेक्षा जास्त वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषविली तसेच अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले.

विद्यार्थी, शिक्षक तसेच चिकित्सकांसाठी उपयोगी अशा २५ पेक्षा अधिक पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले. १६०० पेक्षा जास्त पृष्ठसंख्या असलेल्या व राष्ट्रीय स्तरावर प्रशंसित चरक संहितेवरील टीकाचे ते लेखक आहेत.

पुरस्कार:
  • आयुर्वेदातील संशोधनात्मक कार्यासाठी यदुनाथजी थत्ते पारितोषिक
  • राष्ट्रीय शिक्षण मंडळाकडून कर्मभूषण पुरस्कार
  • वैद्य यादवजी त्रिकमजी आचार्य ग्रंथ पारितोषिक
  • अखिल भारतीय वैद्यक सम्मेलनाचा 'आयुर्वेद पीयुषपाणि पुरस्कार'

 

Kayachikitsa - Ailment wise


Video